पुरवठा विभागातील बडा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला ११ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. आज सायंकाळी साडेसहा वाजता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. लाच लूचपत प्रतिबंधक विभागाला जिल्हा पुरवठा विभागातील या लाचखोरी संदर्भात तक्रार प्राप्त झाले होते. त्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संबंधित अधिकाऱ्याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. या कारवाई संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू होती.
प्रदीप प्रीतम केदार ( वय ५०)असे लाच घेणाऱ्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचे नाव आहे. धान्य साठ्यामध्ये तफावत असल्याची तक्रार वरिष्ठांकडे करू यासाठी या अधिकाऱ्याने ही लाच मागितली होती.