रत्नागिरी:- “सरकार जसं एसटी कर्मचार्यांना बांधिल आहे, त्याप्रमाणे ते जनतेलाही बांधिल आहेत. त्यामुळे यापुढे आता कारवाई तीव्र केली जाईल,” असा इशारा परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी बंद मध्ये सहभागी एसटी कर्मचार्यांना दिला.
विलनीकरणाच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या बंदबाबत सरकार कोणते निर्णय घेणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. एसटी कर्मचार्यांनी कामावर रुजू व्हावे असे आवाहनही सरकारकडून करण्यात आले आहे. यासंदर्भात रत्नागिरी दौर्यावर असलेल्या परिवहनमंत्री अॅड. परब यांनी कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. जिल्ह्यातील बहूसंख्य कर्मचारी अजुनही बंदत सहभागी आहेत. मोजक्या गाड्या रस्त्यावर धावत आहेत. याबाबत परिवहनमंत्री परब म्हणाले, न्यायालयाने अवमान याचिकेची नोटीस प्रत्येक एसटी डेपो ठिकाणी लावण्यास सांगितली आहे, याचा अर्थ आम्हाला कारवाई करण्याचे हे संकेतच आहेत. त्यानुसार बंदत सहभागी कर्मचार्यांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
ओबीसी आरक्षणासंदर्भात ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाविषयीचा ठराव अधिवेशनात केला जाणार आहे. जोपर्यंत इंम्पिरिकल डाटा जमा होत नाही तोवर निवडणुका नको असा सरकारचा मानस आहे. किरिट सोमय्यांच्या बोलण्याचा काहीच फरक पडत नाही. मी कोर्टात गेलो आहे. एकतर त्यांना 100 कोटी द्यावे लागतील किंवा माझी माफी मागावी लागेल. तसेच दापोलीतील तो बंगला माझा नाही. तसेच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत कॅबिनेटने राज्यापालांना प्रस्ताव आहे. 28 डिसेंबर रोजी निवडणूक घ्यावी असं प्रस्तावात म्हटले आहे. हात उंचावून आणि आवाजी मतदानानं असा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्याची सुचना केली आहे.