रत्नागिरी:-तालुक्यातील पावस येथे होळीच्या कार्यक्रमात एक दुर्दैवी घटना घडली आहे. पावस येथील नवलाई पावणाई मंदिर येथे होळी उभी करत असताना कैचीचे नट तुटून हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
अपघातात चंद्रकांत नारायण सलपे (वय ५४) यांच्या डोक्यात होळी पडल्याने मृत्यू झाला आहे. डोक्यामध्ये होळी पडताच त्यांना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र येथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास हि दुर्दैवी घटना घडली, अशी प्राथमिक माहिती मिळत असून या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.