परस्पर विरोधी तक्रार; 7 जणांविरोधात तक्रार दाखल
रत्नागिरी:- तालुक्यातील पावस बाजारपेठेत सामाईक घराच्या वादातून एकमेकांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली असून 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना बुधवार 3 मार्च रोजी दुपारी 12.30 वा.सुमारास घडली.
हसीना नाखवा, तस्लीम नाखवा, आतीक नाखवा, नाझीया काझी, साहिल नाखवा, सफिया नाखवा, सनोबर नाखवा (सर्व रा.पावस बाजारपेठ, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.त्यांच्यात सामाईक घराच्या कारणातून वाद होउन एकमेकांना हातांच्या थापटांनी, फावड्याच्या दांडक्याने, लाकडी पट्टीने तसेच सळीने मारहाण केली.याप्रकरणी अधिक तपास पूर्णगड पोलिस करत आहेत.