रत्नागिरी:- तालुक्यातील पावस येथे मच्छिमारी करण्यासाठी गेलेला तरूण बुडून मयत झाल्याची घटना घडली आहे. प्रवेश पावसकर (32, ऱा पावस खारवीवाडा) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास प्रवेश याचा मृतदेह नाटे समुद्रकिनारी स्थानिक रहिवाशांना आढळून आल़ा. या घटनेची नोंद पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवेश हा 17 मार्च 2023 रोजी मासेमारीसाठी समुद्रामध्ये गेला होता. यावेळी मासेमारी करत असताना प्रवेश हा समुद्राच्या पाण्यामध्ये बुडून बेपत्ता झाला होत़ा. या घटनेची खबर प्रभाकर रामा पावसकर यांनी पोलिसांत दिली होत़ी. दरम्यान 19 रोजी दुपारी नाटे येथे प्रवेश याचा मृतदेह आढळून आल़ा.









