पावस:- पावस बाजारपेठ येथील मारुती मंदिर परिसरात मोकळ्या जागेत मटका जुगारावर पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई साहित्यासह ७९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. संशयिताविरुद्ध पुर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन पांडुरंग बंडबे (४४) असे संशयितांचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २३) दुपारी साडेबाराच्या सुमारास पावस बाजारपेठ येथील मारुती मंदिर येथील मोकळ्या जागेत ब्रीजच्या पायऱ्यावर निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित विनापरवाना जुगाराचे साहित्य बाळगलेल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रशांत पाटील यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.