पावस येथून साडेतीन लाखांचा पान मसाला जप्त

रत्नागिरी:- तालुक्यातील पावस गाडीअड्डा येथे बुधवार 17 एप्रिल रोजी दुपारी 1 वा. सुमारास विमल पान मसाला विक्री करणार्‍याला पूर्णगड पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून ओमनी व्हॅन,रोख रक्कम,विमल पान मसाल्याचे पाउच,तंबाखूचे व गुटख्याचे पाउच असा एकूण 3 लाख 42 हजार 345 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रोशन संजय नाईक (26, रा.कासारवेली भराडीनवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात महिला पोलिस हवालदार सोनाली शिंदे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,बुधवारी दुपारी संशयित रोशन नाईक हा आपल्या ताब्यातील ओमनी व्हॅन (एमएच- 08-झेड- 3757) मधून पावस गाडीअड्डा येथे विमल पान मसाला,तंबाखू,गुटखा हे अपायकारक व नशाकारक पदार्थ विक्री करत असताना पूर्णगड पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. त्याच्या विरोधात भादंवि कायदा कलम 328, 118,272,n273 सह अन्न सुरक्षा व मानके अधिनियमन 2006 कलम- 26 (2) (अ), 27 (2)(ई) 26(अ) 30(2) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.