पावस-पानगलेवाडी येथे मटका जुगारावर पोलिसांचा छापा

पावस:- पावस-पानगलेवाडी येथे मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गणपत रामंचद्र पानगले (वय ५६, रा. धोपटवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ३) दुपारी १ च्या सुमारास पावस-पानगलेवाडी गौतमी नदी किनारी बाभळीच्या झाडाखाली निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना मटका जुगार खेळ चालवत असताना सापडला. त्याच्याकडून साहित्यसह ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस नाईक प्रशांत लोहळकर यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.