रत्नागिरी:- तालुक्यातील पाली बाजारपेठेतील मोबाईल शॉपी फोडून अज्ञातांनी सुमारे 2 लाख 36 हजर 740 रुपयांचा मुद्देमाल लांबवला.यात वेगवेगळ्या कंपनीचे महागडे मोबाईल,घड्याळे आदिचा समावेश आहे.ही घटना 19 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 ते 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वा.कालावधीत घडली आहे.
याबाबत कल्पेश काशिनाथ खोचाडे (30,रा.साठरे बांबर,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानूसार,कल्पेश यांचे पाली बाजारपेठेत रेडजाई मोबाईल शॉपीचे दुकान आहे.अज्ञाताने दुकानाचे लोखंडी शटर मध्यभागी वाकवून त्यावाटे दुकानात प्रवेश केला.त्यानंतर शोकेसमध्ये ठेवलेले रेडमी,व्हिवो,सॅमसंग,लाव्हा,नोकिया,आयडेल कंपनीचे 37 मोबाईल हॅन्डसेट,8 घड्याळे आणि रियलमी कंनीचे इयरबर्ड असा एकूण 2 लाख 36 हजार 740 रुपयांचा ऐवज लांबवला.गुरुवारी सकाळी कल्पेश दुकान उघड्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे शटर वळवलेले दिसून आले.दुकानात जाउन पाहणी केली असता कल्पेशला दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले.त्याने तातडीने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर सुर्य करत आहेत.