रत्नागिरी:- तालुक्यातील पाली-बाजारपेठ येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. संदीप पांडुरंग भोसले (वय ५४, रा. पाली बाजारपेठ रत्नागिरी, मुळ: रावाचे गोठणे, ता. राजापूर) असे मृत प्रौढाचे नाव आहे. हि घटना मंगळवारी (ता. २३) रात्री नऊच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संदिप भोसले यांना मद्याचे व्यसन होते. मंगळवारी पाली-बाजारपेठ येथे रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









