Thursday, July 9, 2026
spot_img
Home चिपळूण पार्किंगमध्ये अनधिकृत बांधकाम; महिलेवर गुन्हा दाखल

पार्किंगमध्ये अनधिकृत बांधकाम; महिलेवर गुन्हा दाखल

चिपळूण:- चिपळूण नगर परिषदेच्या हद्दीत विनापरवाना पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण करून निवासी फ्लॅटचे बांधकाम केल्याप्रकरणी गौरी उदय शेंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण नगर पालिकेच्या वरिष्ठ लिपिकाने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असून, प्रशासनाने अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ जून २०२५ पासून हे अनधिकृत बांधकाम सुरू होते. शहरातील डी.बी.जे. कॉलेज समोर, परशुराम नगर (मार्कडी) येथील मालमत्ता क्रमांक CHIP00001950 आणि UPNZ1000986 या जागेवर हे बांधकाम करण्यात आले होते.

नगर पालिकेचे रचना सहाय्यक (गट ब) यांनी केलेल्या पाहणीत, संबंधित जागेवर पार्किंगच्या ठिकाणी निवासी फ्लॅटचे बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचे प्राथमिक अहवालात निष्पन्न झाले होते. या अहवालाच्या आधारे चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, नगर परिषदेचे वरिष्ठ लिपिक विजय बबन गमरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

या तक्रारीवरून, चिपळूण पोलीस ठाण्यात ‘महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६’ च्या कलम ५२ व ५३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.