Thursday, May 7, 2026
spot_img
Home रत्नागिरी पानवल येथे डंपरच्या ठोकरीत पादचारी तरुण गंभीर जखमी

पानवल येथे डंपरच्या ठोकरीत पादचारी तरुण गंभीर जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील पानवल रस्त्यावर पादचाऱ्याला डंपर चालकाने ठोकर दिली. गंभीर जखमी पादचाऱ्याला बेशुद्ध अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सोनू रामलाल हलवारी (वय ३२, रा. खेडशी, रत्नागिरी मुळ ः बिहार) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ४) दुपारी बाराच्या सुमारास पानवल-चांदसुर्या रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पानवल येथे रस्त्यावर डंपरने पादचारी तरुणाला ठोकर दिली. या अपघातात पादचाऱ्याचा डावा पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून तो अद्यापही बेशुद्ध अवस्थेत आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.