Sunday, May 10, 2026
spot_img
Home रत्नागिरी पर्यटकांच्या दोन गाड्या आरे-वारे समुद्रकिनारी अडकल्या

पर्यटकांच्या दोन गाड्या आरे-वारे समुद्रकिनारी अडकल्या

रत्नागिरी:- सध्या पडत असलेल्या पावसामुळे समुद्र खवळलेला असून किनाऱ्यावरील वाळू ओली झाली आहे. त्यामध्ये पर्यटक गाड्या चालवत आहेत. हा अतिउत्साह अडचणीचा ठरत आहे. बुधवारी सायंकाळी परजिल्ह्यातून आलेल्या दोन गाड्या आरे-वारे येथील समुद्रकिनारी अडकल्या होत्या. किनाऱ्यावरील लोकांच्या मदतीने त्या गाड्या सायंकाळी काढण्यात आल्या. सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.
गणपतीपुळे, आरे-वारे किनाऱ्यावर गेले चार दिवस पर्यटकांची प्रचंड गर्दी आहे. बुधवारी दिवसभरात अधुनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे समुद्रही खवळलेला आहे. बुधवारी सायंकाळी दोन गाड्या पर्यटकांनी किनाऱ्यावर नेल्या होत्या. समुद्राच्या पाण्यात चर्चा अंदाज न आल्यामुळे पर्यटकांची गाडी रुतली, किनाऱ्यावर आरे-वारे समुद्रात ही गाडी काढण्यासाठी क्रेन बोलवावी लागली. बुधवारी आरे वारे येथे एका अति उत्साही पर्यटकाची गाडी समुद्रकिनारी चालवण्याचा थरार करत असताना ही गाडी वाळूत रुतल्याने त्या पर्यटकांची मोठी पंचायत झाली. ही गाडी बाहेर काढण्यासाठी क्रेन आणावी लागली.