Tuesday, August 11, 2026
spot_img
Home रत्नागिरी अचानक तब्येत बिघडलेल्या साळवी स्टॉप येथील प्रौढाचा मृत्यू

अचानक तब्येत बिघडलेल्या साळवी स्टॉप येथील प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप येथील प्रौढाची अचानक तब्येत बिघडल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. संदिप वासुदेव वर्तक (वय ५६, रा. साळवीस्टॉप, वेलकम हॉटेलच्या पाठीमागे, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ९) सायंकाळी साडेसातच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संदिप वर्तक याची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. तेथे घेवून आले असता जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.