चिपळूण:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळून ढिगाऱ्याखाली जेसीबी अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जेसीबीमध्ये दोन कामगार असून त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, दरड खाली कोळसताना एक कामगार पळून गेल्याने तो वाचला असून दुसरा कामगाराचा या घटनेत मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. डोंगराचा काही भाग आणखी घळण्याची भिती असल्याने या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. काम करत असताना कापलेल्या डोंगराची अचानक दरड कोसळली. त्याचा भराव थेट तेथे काम करणाऱ्या जेसीबीवर आल्याने जेसीबी ढिगाऱ्यखाली अडकला आहे. जेसीबीमध्ये दोन कामगारअडकले होते यातील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, डोंगरावरील भराव खाली येण्याची शक्यता असल्याने परशुराम घाटातील वाहुतक दोन्ही बाजूने बंद करण्यात आली आहे. दोन ते अडीच तास वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे घाटामध्ये वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे. मात्र त्याला पर्यायी मार्ग म्हणून कळंबस्ते-चेरणी मार्गे लोटे, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.