खेड:- तुर्की, मलेशिया, कुवेत या देशांमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत 13 तरुणांची 14 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार मोहम्मद सलीम अब्दल्ला सैन (रा. डाकबंगला-खेड) यांनी येथील पोलीस स्थानकात दाखल केली आहे.
तालुक्यातील साखरोली येथील रहिवासी असलेल्या एका एजंटाने परदेशात नोकरी लावण्याचे आमीष दाखवत 13 तरूणांकडून ऑनलाईन 14 लाख 35 हजार रूपये स्वीकारले. या तरूणांना प्रत्यक्षात दिला गेलेला व्हिसा, परमिट, खोटी तिकिटे व बनावट कागदपत्रे देवून फसवणूक केल्याची तक्रार खेडसह दापोली पोलीस स्थानकातही करण्यात आल्याचे मोहम्मद सैन यांनी सांगितले.