रत्नागिरी:- शहरातील परटवणे येथे रस्ता ओलांडणाऱ्या मुलीला धडक देणाऱ्या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला. अपघाताची घटना २ मार्च रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली होती. यश मंगेश शिवलकर (२०, रा. सड्ये शिवलकरवाडी, रत्नागिरी) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. रत्नागिरी शहर पोलिसाकडून त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.
यश हा २ मार्च रोजी दुचाकी (एमएच ०८ एआर ९०४८) घेवून शहरातील परटवणे येथून जात होता. सायंकाळी ६ च्या सुमारास रस्ता ओलांडणाऱ्या मुलीला त्याच्या ताब्यातील दुचाकीची धडक बसली. श्राव्या हर्षद धुळप (७, रा. परटवणे रत्नागिरी) असे जखमी मुलीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणे चालविल्याप्रकरणी गाडी यश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









