परटवणे-खेडेकरवाडी येथे घरातून सोन्याच्या चेनची चोरी; दोघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील परटवणे-खेडेकरवाडी येथील घरातून सोन्याची 15 ग्रॅम वजनाची सुमारे 90 हजार रुपये किंमतीची चेन लांबवली. याप्रकरणी एक तरुण आणि महिलेविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चोरीची ही घटना शुक्रवार 11 ऑगस्ट रोज्ज्ञी रात्री 10.30 ते शनिवार 12 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वा.कालावधीत घडली आहे.

अमित अर्जुन कदम (28) आणि एका अज्ञात महिलेविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्या विरोधात सिताराम भागोजी खेडेकर (81,रा.परटवणे खेडेकरवाडी,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,शुक्रवारी रात्री झोपताना त्यांच्या पत्नीने उशीजवळ काश्याच्या वाटीत गळ्यातील सोन्याची चेन काढून ठेवली होती.दुसर्‍या दिवशी दुपारी त्या वाटीतील चेन घेण्यासाठी गेल्या असता त्यांना त्याठिकाणी चेन मिळून आली नाही.चेन चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांनी शनिवारी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.याप्रकरणी संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे