पत्रकार शशिकांत वारीशे खून प्रकरण; पंढरीनाथ आंबेरकरचा जामीन अर्ज फेटाळला

रत्नागिरी:- राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकरचा जामीन अर्ज न्यायालयाकडून फेटाळून लावण्यात आला. यापूर्वी आंबेरकर याला ६ आठवड्यांचा अल्पकालीन जामीन न्यायालयाकडून मंजूर झाला होता. नुकतेच कारागृहात हजर होताच आंबेरकरने पुन्हा एकदा वैद्यकीय कारण देत जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यावेळी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळत आंबेरकरला पोलिसांच्या देखरेखीखाली उपचार घेण्यास सांगितले.

कशेळी येथील पत्रकार शशिकांत वारिशे याचा थार गाडीखाली चिरडून खून केल्याप्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ नुसार राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

करण्यात आला होता. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी त्याला अटक करण्यात आली होती. आंबेरकर याने न्यायालयात एकूण चारवेळा जामीन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३ अर्ज यापूर्वी फेटाळून लावण्यात आले. तर जानेवारी २०२६ मध्ये वैद्यकीय कारणास्तव आंबेरकरने जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जाचा मानवतेच्या दृष्टीने विचार करत न्यायालयाने ६ आठवड्यांचा जामीन अर्ज मंजूर केला होता.

दरम्यान, सहा आठवड्याचा जामीन कालावधी संपुष्टात येताच आंबेरकर कारागृहात हजर झाला. यावेळी पुन्हा एकदा आंबेरकर याने आपल्या आजारपणाचे कारण पुढे केले. आंबेरकर याच्यावतीने न्यायालयापुढे सांगण्यात आले की, आरोपी तीव्र उच्च रक्तदाब, मधुमेह या आजारांनी त्रस्त आहे. यामुळे वेदना होतात आणि मज्जातंतूंवर दबाव आल्यामुळे कंबर व पायांमध्ये मुंग्या येणे किंवा अशक्तपणा येऊ शकतो. न्यायालयाच्या आदेशानुसार सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रक्त, लघवी तपासणी व सोनोग्राफी केली. त्यात आरोपीला किडनी स्टोन व पित्ताशयात खडे असल्याचे आढळले आहे. तसेच रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये यूरोलों जिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट किंवा कार्डिओलॉ जिस्ट उपलब्ध नाहीत. कायमस्वरूपी एम.डी. (फिजिशियन) देखील नियुक्त नाही. खासगी डॉक्टरांनी आंबेरकर याला युरोलॉजिस्टचा सल्ला घेण्यास सांगितले आहे. वरील परिस्थिती पाहता आरोपीला किडनी, पित्ताशय, प्रोस्टेट आणि गुदद्वाराशी संबंधित आजारांसाठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. ठे रत्नागिरीत योग्य सुविधा नसल्याने मुंबईत स्वखचनि उपचार करण्यासाठी अल्पकालीन जामीन आवश्यक आहे. आरोपीने पूर्वीच्या जामिनाच्या सर्व अटीचे पालन केले आहे. त्यामुळे उपचारासाठी आंबेरकर याला चार महिन्यांच्या जामिनाची मागणी न्यायालयापुढे करण्यात आली.

पोलिसांच्या देखरेखीखाली उपचार घ्या: सरकार पक्ष

सरकार पक्षाकडून जामीन अर्जाला विरोध करताना सांगितले की, आंबेरकर विरुद्ध गुन्हा गंभीर असून त्याचा गुन्हेगारी इतिहास आहे. तो साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो किंवा फरार होऊ शकतो, उपचार पोलीस देखरेखीखाली करता येऊ शकतात. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताना सांगितले की, न्यायालयापुढे सादर करण्यात आलेल्या वैद्यकीय अहवालांचा विचार करता, तातडीने उपचारासाठी बाहेर पाठवण्याची गरज दिसत नाही. गंभीर समस्या असल्यास आरोपीला पोलीस देखरेखीखाली खासगी रुग्णालयात नेऊ शकते.