रत्नागिरी:- घरगुती वादातून माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सावंत यांना भरबाजारपेठेत झालेल्या मारहाण प्रकरणी पती आणि दोन महिलांना मंगळवारी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
गोखले नाका येथील सलोनी ब्युटी पार्लर वरुन स्वप्नाली सावंत आणि त्यांचा पती सुकांत सावंत यांच्यात वाद सुरु होते.काही दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास स्वप्नाली सावंत पार्लरमध्ये असताना सुकांत सावंत, निधा वायंगणकर यांनी त्यांना पार्लरमधून बाहेर काढून त्यांच्या डाव्या हाताच्या करंगळीचा चावा घेतला.त्यानंतर निधा आणि भक्ती शिंदे या दोघींनी मिळून त्यांचे केस धरत हातांनी पाठीवर मारहाण करत मानेवर नखे लावली. तसेच गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला .त्यानंतर पती सुकांत सावंत यांनी हातांनी मारहाण करत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेत त्यांचे सामान फेकून दिले आणि गाडीची व रुमची चावी घेउन निघून तिन्ही संशयित निघून गेले होते.
याप्रकरणी स्वप्नाली सावंत यांनी शहर पोलीस स्थानकात तरकार दिली होती.या तक्रारीवरून पोलिसांनी सुकांत गजानन सावंत (रा.मिर्या बंदर,रत्नागिरी) निधा (पुजा) स्वेतांग वायंगणकर आणि भक्ती शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच यातील तीनही संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायलयात धाव घेतली होती.त्यावर सुनावणी होऊन न्यायलयाने तिघांनाही अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.सुकांत सावंत यांच्या वतीने अॅड..संग्राम देसाई तर भक्ती सावंत यांच्यावतीने अॅड.मुद्दसर डिंगणकर, अॅड.परुळेकर, अॅड. सचिन नाचणकर यांनी बाजू मांडली.









