नोकरीच्या नावाखाली मिरजोळेतील तरुणीची 65 हजारांची फसवणूक

रत्नागिरी:- काम मिळेल या आशेने व्हॉटसअ‍ॅपवर आलेल्या लिंकवर क्लिक करुन तरुणी आपल्या खात्यातील तब्बल 65 हजार 424 रुपये गमावून बसली. ही घटना 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.24 ते 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.40 वा.कालावधीत मिरजोळे येथे घडली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अनिशा स्वामीदत्त रुमडे (रा.मिरजोळे कालिकानगर,रत्नागिरी) हिने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल आहे.

त्यानूसार,तिच्या व्हॉट्सअ‍ॅपर एका अनोळखी नंबरवरुन एक मोल लिंक पाठवण्यात आलेली होती.त्यामध्ये स्वतःची माहिती देउन त्याबदल्यात काम मिळेल असे संशयिताकडून सांगण्यात आलेेले होते.आपल्याला काम मिळेल या आशेने अनिशाने त्या लिंकवर क्लिक केले.त्यानंतर संशयिताच्या सांगण्यावरुन आपल्या खात्यातील 65 हजार रुपये पाठवूनही त्या बदल्यात कोणतेही कमिशन अथवा पैसे तिला मिळाले नाहीत.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.