रत्नागिरी:- नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिलेची 2 लाख 36 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोन संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीची ही घटना 26 जुलै रोजी दुपारी 3 ते शुक्रवार 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वा.कालावधीत हिंदु कॉलनी येथे घडली आहे.
संतोष कुमार आणि न्यानसी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात अर्षा परवेज सज्जाद फणसोपकर यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, 26 जुलै रोजी पासून संतोष आणि न्यानसी या दोघांनी अर्षा फणसोपकरला फोन करुन आपण शाईन डॉट कॉम मधून बोलत असून नोकरी देण्याचे आमिष दाखले.त्यासाठी वेगवेगळ्या कारणांसाठी दोघांनीही वेळोवेळी तिच्याकडून पैशांची मागणी करुन आपल्या खात्यात तिच्याकडून ऑनलाईन पैसे जमा करुन घेतले. यात न्यानसीने 14 हजार 500 रुपये तर संतोषने 1 लाख 58 आणि 63 हजार 500 रुपये असे एकूण 2 लाख 36 हजार रुपये उकळले.
ऐवढे पैसे भरुनही नोकरी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे अषा फणसोपकरच्या लक्षात येताच तिने तातडीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही संशयितांविरोधात भादंव कायदा कलम 420, 34 प्रमाणे तसेच तंत्रज्ञान अधिनियम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.