नोकरीचे आमिष दाखवत साळवी स्टॉप येथील तरुणाची 2 लाख 84 हजारांची फसवणूक

रत्नागिरी:-इंडिगो एअर लाईन्स कंपनीमध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून रत्नागिरी नजीकच्या नाचणे येथील तरुणाला 2 लाख 84 हजार 877 रुपयांना लुटल्याची घटना 16 डिसेंबर ते 31 जानेवारी 2021 या दरम्याने घडली. 

राहुल शर्मा असे फोनवरुन फसवणूक करणार्‍या अनोळखी व्यक्तीचे नाव आहे. त्याने शुभम केदारनाथ मिनीयार (27, कांचनसूर्या अपार्टमेंट, नाचणे रोड, साळवीस्टॉप, रत्नागिरी) याच्या मोबाईल फोन केला. तुम्हाला इंडिगो एअर लाईन्स कंपनीमध्ये कामाला लावतो सांगितले. यासाठी आपल्याला काही रक्कम भरावी लागेल. त्याच्या या बोलण्यावर भुलून तरुणाने एसबीआय बॅक, बँक ऑफ बडोदा, एच.डी.एफ.सी., फिनापेमेंट बॅक, जनता सहकारी बँक अशा 5 बँंकांमध्ये वेगवेगळया अकाउंटवर 2 लाख 84 हजार 877 रुपये भरण्यास सांगितले. 

तरुणाने त्याच्याकडे नोकरीविषयी विचारल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शुभम याने रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार राहुल शर्मा याच्यावर भादवि कलम 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.