रत्नागिरी:- तालुक्यातील नेवरे येथील महावितरण कंपनीच्या विद्यूत वाहक तारेचा शेतात चरणाऱ्या गायीला शॉक लागला. यामध्ये दुभत्या गाईचा मृत्यू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ही घटना सोमवारी (ता. १५) सकाळी सव्वा आठच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार नेवरे गावातील शेतकरी रघुनाथ गुरव हे नेहमीप्रमाणे आपली जनावरे चरविण्यासाठी घेऊन जात होते. सोमवारी सकाळी शेतात तुटलेल्या विद्युत तारेचा चालू स्थितीत असताना त्यांच्या गाईला लागला. त्यांच्या डोळ्यासमोर दुभती गाय गतप्राण झाली. यावेळी गाईला बांधलेली दोरी ही त्यांच्या मुलगा विनायक यांच्या हातात होती ; तर रघुनाथ यांच्या जवळ बैलाची दोरी होती. केवळ नशीब बलवत्तर म्हणून या अपघातातून विनायक मात्र वाचला. या घटनेची माहिती मिळातच घटनास्थळी महावितरण कंपनीचे कर्मचारी, तलाठी , सरपंच, पोलिस पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी, पोलिस उपस्थित होते. विद्युत तारेमुळे दुभत्या गायीची मृत्यू पाहून आणि शेतकऱी गुरव यांचे झालेले नुकसान पासून नेवरे ग्रामस्थांमधून मात्र हळहळ व्यक्त होत आहे.