Wednesday, May 6, 2026
spot_img
Home रत्नागिरी गवळीवाडा येथील वृध्द महिलेचा आकस्मिक मृत्यू

गवळीवाडा येथील वृध्द महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- किडनीचा आजार असलेल्या वृद्धेच्या पोटात दुखू लागल्याने तिला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. सरिता विजय वाईकर (वय ७३, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे मृत वृद्धेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १५) पहाटे सव्वा चारच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरिता वाईकर यांना कडनीचा आजार होता. मागील दोन वर्षे त्या काम करत नव्हत्या. मंगळवारी (ता. १४) अचानक त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.