नेवरेतील तरुण काळबादेवीत बुडून बेपत्ता

रत्नागिरी:- तालुक्यातील काळबादेवी येथील समुद्रात तरुण बुडून बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गजानन महादेव पेडणेकर (रा. नेवरे, रत्नागिरी) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. गजानन हा ७ ऑगस्ट रोजी काळबादेवी बंदर पिराजवळ उभ्या असलेल्या बोटीवरुन पाण्यात पडून बेपत्ता झाला, अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसात दाखल करण्यात आली आहे. गजानन याला शोधण्यासाठी स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य पोलिसांकडून सुरू आहे.