नेत्रावती एक्स्प्रेसमधून प्रवाशाचा मोबाईल लंपास

खेड:- कोकण मार्गावरून धावणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा ११ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरट्याने लंपास केल्याची घटना ३ जानेवारी रोजी दुपारी १२.५० ते १.१५ च्या दरम्यान येथील स्थानकात घडली.

त्यानुसार अज्ञात चोरट्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश रमेश सिंह (३०) हे ३ जानेवारी रोजी १६३४६ क्रमांकाच्या नेत्रावती एक्स्प्रेसमधून बोगी नंबर एच-२ मधील आसन क्रमांक १६ वरून प्रवास करत असताना ते झोपी गेल्याची संधी साधत त्यांच्या हातातील ११ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरट्याने लंपास केला.