रत्नागिरी:-किरकोळ कारणातून वडिलांना मारहाण केल्याप्रकारणी मुलाविरोधात जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी 5.30 वा. सुमारास निवेंडी शीतपवाडी येथे घडली.
निलेश महादेव मालप (33,रा. निवेंडी शीतपवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. त्याच्याविरोधात त्याचे वडील महादेव सदाशिव मालप (70, रा.निवेंडी शीतपवाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी सायंकाळी निलेश दारू पिऊन घरी आला आणि त्याने वडिलांना तू घरात बसून खातोस माझ्यासोबत बोटीवर कामाला चल असे म्हणाला. तेव्हा मी बोटीवर कधीही काम केलेले नाही.गणपतीपुळे येथील हॉटेल सुरु झाल्यावर मी तिथे कामाला जाईन असे त्यांनी सांगितले.