रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी येथील घराच्या किचन बाहेर असलेल्या पत्र्याच्या हुकला लावून ठेवलेली पर्स अज्ञाताने लांबवली. त्या पर्समध्ये रोख 15 हजार रुपये आणि सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज होता. चोरीची ही घटना गुरुवार 5 जून रोजी दुपारी 12.30 ते 2.30 वा. कालावधीत घडली आहे.
याबाबत फिर्यादी महिलेने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार,फिर्यादी या निवळी येथील गणेश जोगळेकर यांच्या घरी घरकाम करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपली पर्स घराच्या किचनच्या बाहेरील बाजूला उघड्यावर उभ्या केलेल्या पत्र्याला असलेल्या लोखंडी हुकला आपली पर्स लावून ठेवली होती. काम आटोपून त्या आपली पर्स घेण्यासाठी बाहेर आल्या असता त्यांना आपली पर्स मिळून आली नाही. पर्समध्ये रोख 15 हजार रुपये,सोन्याची 2 मंगळसूत्रे, कानातले, कानचेन पट्टी व इतर साहित्य असा एकूण 2 लाख 25 हजा 800 रुपयांचा मुद्देमाल होता. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.