निवळी-बावनदी येथे दारु अड्यावर धाड

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी-बावनदी येथे दारु अड्यावर पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये २६० रुपयांची पाच लिटर दारु जप्त केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शशिकांत विष्णू पवार (वय ३५, रा. निवळी बावनदी रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.

ही घटना सोमवारी (ता. २५) सकाळी पावणे अकराच्या समारास निवळी-बावनदी खापरेवाडी पऱ्याचे सुक्या पात्रात झाडीझुडपाच्या आडोशाला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताकडे २५० रुपयांची विनापरवाना हातभट्टीची पाच लिटर दारु सापडली. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.