रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी-जयगड रस्त्यावरील ओरी फाटा येथे कारच्या धडकेत दोन पादचारी महिला जखमी झाल्याची घटना सोमवार 27 जानेवारी रोजी सकाळी 10 च्या सुमारास घडल़ी. मानसी प्रदीप कुळये (40) व प्रभावती प्रकाश सांबरे (59, ऱा धामणसे ता. रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत़. याबाबतची तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. पोलिसांनी कारचालकावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल़ा आहे. मकरंद महादेव कोयंडे (27, ऱा शिवडी कोळीवाडा, मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आह़े.
मकरंद हा 27 जानेवारी रोजी कार (एमएच 01 ईव्ही 9997) घेवून गणपतीपुळे ते मुंबई असा जात होता. सकाळी 10 च्या सुमारास ओरी येथे आला असता त्याचा कारवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूने चालणाऱ्या 2 महिलांना त्यांची धडक बसली, अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसात करण्यात आली आह़े. पोलिसांनी मकरंद याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम 281, 125 (अ), 125 (ब) व मोटार वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल केल़ा.