रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी घाट येथे उघड्या चिऱ्याच्या शेडमध्ये विनापरवाना मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ३६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयेंद्र बाबु कांबळे (वय ५०, रा. पांगरी बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १३) सायंकाळी सहाच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार संशयित जयेंद्र हे निवळी घाट येथे एका उघड्या चिऱ्याच्या शेडमध्ये मटका जुगार खेळ खेळत असताना सापडले. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.