रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी-कोकजेवठार येथे अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (ता. ८) रात्री पावणे नऊच्या सुमारास पुर्वी गावातून वाहणारी नदीचे पात्रात नमशीशेतीच्या बाजूला कड्याचा आड येथे निदर्शनास आली. या अनोळखी पुरुषाचा वय अंदाजे ४५ ते ५० वर्षाचे आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोकजे वठार गावातून वाहणारी नदीचे पात्रात नमशी शेतीच्या बाजूला नदीवरील निवळी धबधब्याचे खालील बाजूस अनोळखी पुरुषाचा मृतदेह असल्याचे पोलिस पाटील शितप यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. खबर मिळताच ग्रामीण पोलिस घटनास्थळी गेले होते. पोलिस आणि ग्रामस्थ यांनी निवळी धबधबा कड्याचा आड येथे नदीत जाऊन पाहिले असता अनोळखी गावातील अथवा परिचयाचा नसल्याचे समजून आले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणला.