रत्नागिरी:- कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याचा संभव असल्याचे माहिती असतानाही रात्री १०.३० नंतर आपल्या दुकानात ग्राहकांना प्रवेश देत विक्री केली. याप्रकरणी ४ जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ८ व ९ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० ते ११.५० वा.कुवारबाव,मारुती मंदिर आणि माळनाका येथे करण्यात आली आहे.
प्रणव कांबळे (२५,रा.धामणी), चित्रसिंग गांधी(५७), रोहित गांधी (२७, दोन्ही रा. मारुती मंदिर, रत्नागिरी ) आणि साहिल कागवाड(२४,रा.नाचणे, रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून कोरोना काळात रात्री उशिरापर्यंत आपल्या मालकीच्या चायनीज सेंटर आणि पान शॉपमध्ये गिऱ्हाईकांना प्रवेश देत विक्री केली. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.