रत्नागिरी:- शहरातील नाचणे-शांतिनगर येथील प्रौढाने गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. शशिकांत आप्पा तेली (वय ४८, रा. शांतिनगर- नाचणे, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २६) सकाळी साडेसातच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शशिकांत तेली यांनी कोणत्यातरी अज्ञात कारणातून रहात्या घरी गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. नातेवाईकांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान मंगळवारी (ता. २७) सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.