रत्नागिरी:- शहरातील रसाळवाडी-नाचणे येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी पळविली. शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ डिसेंबर ते ३ जानेवारी २०२६ सकाळी साडेनऊच्या मुदतीत शहरातील नाचणे-रसाळवा़डी येथील स्नेहसंकुल अपार्टमेंट येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अमर अनंत म्हस्के (वय ३७, रा. स्नेह संकुल अपार्टमेंट, रसाळवाडी, रत्नागिरी) यांनी दुचाकी (क्र. एमएच-०८ ए.एफ १२००) ही स्नेह संकुल अपार्टमेंटच्या बिल्डींगखाली पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती पळविली. या प्रकरणी अमर म्हस्के यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









