रत्नागिरी:- शहरानजीकच्या नाचणे येथे जुगार खेळ चालवणार्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.48 वा.करण्यात आली.
साईराज चंद्रकांत सुर्वे (24, रा.रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल अमोल अरुण भोसले यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी तो मंगळवार आठवडा बाजार येथील बंद टपरीच्या पाठीमागे बेकायदेशिरपणे कल्याण मटका जुगार खेळ चालवत असाताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.