नाचणे येथील प्रौढाची अज्ञात कारणातून आत्महत्या

रत्नागिरी:- शहराजवळील नाचणे-वाडेकरवाडी येथील प्रौढाने अज्ञात कारणाने गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. महेश रामचंद्र वाडेकर (वय ४२, रा. वाडेकरवाडी नाचणे, रत्नागिरी ) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ८) रात्री साडेनऊच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खबर देणार व त्यांची आई सौ. रत्नामाला या महालक्ष्मी पिठाची गिरण, राजिवडा-रत्नागिरी येथे सकाळी सहाच्या सुमारास गेले होते. त्यावेळी साडे आठच्या सुमारास खबर देणार त्यांच्या आईच्या मोबाईलवर त्यांचे जावई संजय केशव कळंमस्ते यांनी फोन केला की, मुलगा महेश याने घरातील बेडरुममध्ये माळ्याच्या लोखंडी बाराला साडीने बांधून गळफास घेतला असल्याचे सांगितले. त्यानंतर महेश यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला तापसून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.