Friday, August 7, 2026
spot_img
Home रत्नागिरी नाचणे येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

नाचणे येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील श्रीरामनगर नाचणे येथील तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. प्रसाद गणेश आंब्रे (वय २६, रा. श्रीरामनगर, नाचणे, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ५) सायंकाळी सातच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रसाद आंब्रे हा बेशुद्ध अवस्थेत त्याच्या घरी आढळला त्याला खबर देणार संदिप प्रकाश राघव यांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.