नाईक हायस्कूलजवळ गांजा सेवन करताना एकजण ताब्यात

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात नाईक हायस्कूल ते राहुल कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, राहुल कॉलनीतील सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला एका व्यक्तीला गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई १९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७:४५ वाजता करण्यात आली.

याप्रकरणी तेजस प्रदिप देसाई (वय ३०, रा. घर नं. ७००७/झेड ३२, गोविंदराज, रमेशनगर, नाचणे, ता.जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रविण पुरुषोत्तम वीर (वय ४३) यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी तेजस देसाई हा नमूद ठिकाणी बेकायदेशीरपणे गांजाचे सेवन करत असताना मिळून आला.

या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात २० एप्रिल २०२५ रोजी रात्री ००:३८ वाजता करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.