नववर्ष स्वागताला येणाऱ्या पर्यटकांसाठी सज्ज रहा; जिल्हा प्रशासनाकडून सूचना

रत्नागिरी:- सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांचा ओढा कोकणाकडे असतो. त्यासाठी प्रशासन सज्ज असून, किनारी भागासह ऐतिहासिक ठिकाणी सुरक्षिततेबरोबरच स्वच्छतेसाठी प्राधान्याने खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.  

धुडगूस घालणार्‍या पर्यटकांना आवर घालण्यासाठी खास टास्क फोर्सचे नियोजन प्रशासनाने केले आहेत.  वर्षाच्या अखेरच्या दिवशी नववर्षाच्या स्वागतासाठी काही पर्यटकांतून गडाचे पावित्र्य न राखता त्या ठिकाणी हुल्लडबाजी करून धुडगूस घातला जातो.
हा धुडगूस आता खपवून घेतला जाणार नाही. पोलिसांची करडी नजर या स्थळांवर ठेवण्यात येणार  आहे. त्यामुळे कोकणात धूडगुस घालणार्‍यांना चाप बसणार आहे.