रत्नागिरी:- तालुक्यातील नरबे येथे विनापरवाना हातभट्टीची दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी २६० रुपयांची पाच लिटर दारु जप्त केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुनिल महादेव चरकरी असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १३) दुपारी साडेचारच्या सुमारास नरबे येथे निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित सुनिल चरकरी यांच्याकडे २६० रुपयांची ५ लिटर दारु विक्रीसाठी स्वतःकडे ठेवलेली होती. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.