Monday, July 27, 2026
spot_img
Home रत्नागिरी धामणसेत कौटुंबिक वादातून तरुणाची गळफास घेत आत्महत्या

धामणसेत कौटुंबिक वादातून तरुणाची गळफास घेत आत्महत्या

रत्‍नागिरी:- तालुक्यातील धामणसे चौकेवाडी येथील तरुणाने पत्‍नीसोबत झालेल्या वादातून राहत्‍या घरी गळफास घेत आत्‍महत्‍या केली. ही घटना शनिवार 25 जुलै रोजी दुपारी 2.30 ते 2.45 वा.सुमारास उघडकीस आली.

नितीन नारायण कळंबटे (26, रा.धामणसे चौकेवाडी, रत्‍नागिरी) असे गळफास घेत आत्‍महत्‍या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नितीनचा शनिवारी सकाळी पत्‍नीसोबत घरगुती कारणावरुन वाद झाला होता. या वादातूनच त्‍याने घरातील रुममध्ये लाकडी वाश्याला नायलॉन साडीने गळफास घेत आत्‍महत्‍या केली. ही बाब त्‍यांच्या नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्‍यांनी याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्‍यांनी तातडीने घटास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.