खेड:- धनादेशाचा अनादर करत जुबेरा अ. करीम हवा यांना येथील न्यायदंडाधिकाऱ्यांनी दीड लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास १ महिन्याची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. फिर्यादीच्यावतीने ॲड. समीर शेठ यांनी काम पाहिले.
मंडणगड तालुक्यातील राजेश सुरेश सावंत यांनी फिर्याद दाखल केली होती. १ लाख ३० हजार रुपये फेडण्याचे मान्य करत तसा धनादेशही फिर्यादीला दिला होता. हा धनादेश न वटल्याने अखेर दीड लाख रुपये दंड आकारण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. ही रक्कम ३० दिवसात न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.