रत्नागिरी:- रत्नागिरीच्या पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत बेपत्ता प्रकरण आता नव्या वळणावर आले असताना अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. स्वप्नाली सावंत यांचे पतीसोबत सातत्याने खटके उडत होते. दोन वर्षांपूर्वीच पतीने स्वप्नाली सावंत हिचा काटा काढण्याचे ठरवले असे तपासात पुढे आल्याचे सूत्रांकडून समोर आले आहे.
पती पत्नीत अनेक विषयावरून वाद होते. अनेक वाद विकोपाला गेले. काही वाद थेट सोशल मिडियावर गेले. बदनामी झाल्याने पत्नीचा काटा काढायचा कट दोन वर्षांपूर्वीच रचला गेला होता अशी माहिती नाव न देण्याचा अटीवर देण्यात आली आहे. दोन वर्षे विचार करून हा काटा काढण्यात आला अशी समोर आली आहे. आता यात कोण कोण सहभागी आहेत हे समोर आणण्याचे आव्हान असून या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.