दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू; मृत्यूसंख्या 44 वर

रत्नागिरी:- जिल्ह्यात दोन कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून कोरोना बळींची संख्या 44 वर पोचली आहे. तर प्राप्त अहवालांमध्ये 27 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 336 इतकी झाली आहे.

दरम्यान बुरोंडी दापोली येथील 60 वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तर माजळ लांजा येथील 56 वर्षीय कोरोना रुग्णाचाही उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे  मृतांची संख्या आता 44 झाली आहे.