दोघे ड्रग्ज तस्कर रत्नागिरीतून दोन वर्षांसाठी तडीपार

रत्नागिरी:- ड्रग्ज तस्करी करणार्‍या रत्नागिरीतील दोन तस्करांना तीन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केल्याचे आदेश प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी जारी केले आहेत. याबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप माईणकर यांनी दिली.

ड्रग्ज विक्री व तस्करी करणार्‍या तस्करांचे कंबरडे मोडण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी मोठी मोहिम हाती घेतली आहे. या तस्करांविरोधात तडीपारीचे प्रस्ताव पाठवून त्यांना तडीपार करावे अशी मागणी पोलिसांनी प्रांताधिकार्‍यांकडे केली होती. हे प्रस्ताव पोलीस अधीक्षकांच्या सहीने प्रांताधिकार्‍यांकडे आले होते.
यावर सुनावणी घेऊन पोलिसांनी सलमान नाजीम पावसकर (रा. राजीवडा) याच्यासह फैसल मकसूद म्हस्कर (रा. कर्ला) या दोघांना रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. दरम्यान अजूनही तडीपारीचे प्रस्ताव सुनावणीसाठी प्रांताधिकारी कार्यालयात आहेत. लवकरच त्यावर सुनावणी होईल अशी माहिती डिवायएसपी माईणकर यांनी दिली.