रत्नागिरी:- तालुक्यातील पावस येथे बेकायदेशिरपणे देशी-विदेशी दारुच्या बाटल्या भरलेला बॉक्स विक्रीसाठी जवळ बाळगल्याप्रकरणी तरुणाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई स्वामी मंदिर येथील गडग्याच्या आडोशाला शनिवार 4 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वा.करण्यात आली.
स्वप्निल महादेव डोंगरे (36,रा.पावस गोडबोलेवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात पोलिस हेड काँस्टेबल शिवानंद चव्हाण यांनी तक्रार दिली आहे.त्यानूसार,शनिवारी रात्री स्वप्निल विनापरवाना आपल्याकडे देशी-विदेशी दारुच्या बाटल्यांनी भरलेला बॉक्स घेउन विक्री करण्यासाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.त्याच्याकडून एकूण 4 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी अधिक तपास पूर्णगड पोलिस करत आहेत.