संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील हातीव शेलारवाडी तांबड येथे छताची कौले काढून घरात शिरुन 25 हजाराची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची फिर्याद जयप्रकाश सावंत (56, हातीव, शेलारवाडी) यांनी देवरुख पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 26 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयप्रकाश यांचे घर बंद असताना घराची कौले काढून चोरटयाने प्रवेश केला. बेडरुम व किचन, देवघरातील लोखंडी कपाट फोडून त्यातील 20 हजाराची रोख रक्कम, 2 हजार रुपयांचे दोन पितळेचे व जर्मनीचे टोप, पितळेचा बंब, तसेच 2 हजार रुपयांच्या घरातील वस्तू चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जयप्रकाश सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातावर भादविकलम 380, 454, 457 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









