Monday, May 25, 2026
spot_img
Home दापोली दुचाकी अपघातात शिक्षकाचा मृत्यू

दुचाकी अपघातात शिक्षकाचा मृत्यू

दापोली:- मोटारसायकल अपघातात येथील महाळुंगे प्राथमिक मराठी शाळेत कार्यरत असलेले शिक्षक दिलीपकुमार तुळशीराम पेठे यांचे निधन झाले. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. १३ फेब्रुवारीला दिलीपकुमार पेठे हे मोटारसायकलवरून दापोली येथे जात असताना त्यांचा अपघात झाला. अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने दापोली येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अधिक उपचारासाठी त्यांना त्यांच्या मूळ जिल्हा अकोला येथे हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र, अकोला येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले.